महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकातातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे.
या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक बलाढ्य खेळाडू आहेत. दरम्यान या मालिकेचा थरार लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
भारत – इंग्लंड टी-२० मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी टी-२० मालिका तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल. ही मालिका तुम्हाला फ्री मध्ये पाहता येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला ही मालिका हॉटस्टावर लाईव्ह पाहायची आहे. तर तुम्हाला सब्स्किप्शन घ्यावं लागेल. तर हा सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहू शकता.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उप कर्णधार), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड: फिल सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, लियाम लिविंगस्टन, जेमी ओवरटन, गस एटकिंसन, आदिल राशिद, जोफ्रा आर्चर, मार्क वुड.