महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। उत्तर भारतातील सर्वात सुंदर राज्य म्हणून उत्तराखंडने पर्यटकांच्या मनात स्थान पटकावले आहे. लोक हिवाळ्यात उत्तराखंडला हमखास भेट देतात. कारण, या ऋतूत तिथे सर्वजागी पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली आहे.
तुम्हीही यंदा उत्तराखंडला जाण्याचा विचार करत असाल तर उत्तराखंडसाठी IRCTC ने धमाकेदार पॅकेज आणले आहे. उत्तराखंडची वाढती लोकप्रियता पाहता रेल्वेने नवे कोरे पॅकेज आणले आहे.
उत्तराखंड त्याच्या निसर्गसौंदर्यांने पर्यटकांना आकर्षित करत असतं. केवळ निसर्ग सौंदर्य नाही, तिथे असलेली विविध परंपरा, संस्कृती, खाद्यपदार्थ पर्यटकांना आपले वाटतात.
काय काय असेल IRCTC पॅकेजमध्ये
उत्तराखंडसाठी नियोजित केलेल्या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्या-पिण्यासह राहण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. म्हणजे एकदा हे पॅकेज घेतला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही बिंधास्तपणे हे पॅकेज घेऊ शकता.
उत्तराखंड पॅकेजमध्ये किती खर्च असेल
उत्तराखंडला जाण्यासाठी अनेक दिवस तुम्ही पैशांची बचत करत असाल. मात्र,याची आता गरज नाही. तुम्हाला केवळ २२,६४० इतके पैसे यासाठी मोजावे लागणार आहेत. इतक्या कमी पैशात तुम्हाला उत्तराखंडमध्ये ७ रात्री आणि दिवस राहता येणार आहे.