महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ जानेवारी ।। १ फेब्रुवारीला केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या पदरात काय पडणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. टॅक्सपासून ते सोने चांदीच्या भावाबाबत निर्णय होऊ शकतो. या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Budget 2025)
मिडिया रिपोर्टनुसार, आता १० लाखांचे उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना टॅक्स फ्री होऊ शकतो. याबाबत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. सध्या १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना ३० टक्के इन्कम टॅक्स भरावा लागतो. परंतु याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.
निर्मला सितारामन यांनी २०२० मध्ये नवीन टॅक्स रिजीमची सुरुवात केली होती. यामध्ये होम लोनवर टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळत नाही. परंतु टॅक्स रेट कमी होता. आयटीआर फाइल करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. (Tax Free Income Upto 10 lakh)
सध्या ७२ टक्क्यांपेक्षा जास्त नवीन टॅक्स रिजीमअंतर्गत आयटीआर फाइल करत आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींवर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही.त्यामुळे आता आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
२०२३-२४ मध्ये आयटीआर फाइल करणाऱ्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांना झीरो रिटर्न फाइल केला आहे. म्हणजेच या लोकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे. १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना ३० टक्के आयटीआर भरावा लागत होता.मात्र, आता याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.
सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे वार्षिक १० लाखांचे उत्पन्न हे गरजेचे वाटत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शहरी भागात ही रक्कम उदरनिर्वाहासाठी योग्य असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.