Maharashtra weather : राज्यात गारठा वाढला : ५ दिवस तापमानात चढ-उतार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ जानेवारी ।। Maharashtra cold wave: राज्यात किमान तापमानात घट होत असल्यामुळे पुन्हा गारठा वाढत आहे. मात्र अद्यापही हवी तशी थंडी परतलेली नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारठा वाढल्यामुळे काही जणांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याचा पारा हळू हळू घसरत आहे, त्यामुळे थंडी परत येत असल्याचे दिसत आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत आहे. एकामागोमाग येणाऱ्या पश्‍चिमी चक्रवातांमुळे थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला सुरू झालेला थंडीचा कडाका दोन ते तीन दिवसात कमी झाला. त्यानंतर महाराष्ट्रातून थंडी गायब झाली. मागील आठवड्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला.

पुण्यात काय वातावरण ?
दिवसभर ऊन आणि रात्री गारव्यामुळे पुणेकरांचे आरोग्यही बिघडत आहे. गेल्या २४ तासांत शहराच्या काही भागातील किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली. त्यामुळे हवेली, माळीण, शिवाजीनगर, एनडीए परिसरात रात्री थंडी जाणवत आहे. तर दिवसभर कमाल तापमान ३४ अंशांपुढे जात असल्यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे.

नवीन वर्षाच्या सुरवातीला सुरू झालेला थंडीचा कडाका दोन ते तीन दिवसात कमी झाला. त्यानंतर शहरासह जिल्ह्यातून थंडी गायब झाली. मागील आठवड्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून शहरात पुन्हा किमान तापमानात घट होऊ लागली आहे. तीन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घटल्यामुळे १६ अंशांवर पोहचलेले किमान तापमान १० अंशांपर्यंत खाली आले आहे.

अकोल्याचा पारा घसरला –
अकोल्यात गेल्या आठ दिवसात 4 अंश सेल्सियसने घसरला पारा घासरलाय.. मात्र, या आठवड्यात थंडी आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पारा घसरल्याचे जाणवले आहे. सोमवारी निच्चांकी 13.01 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर मंगळवारीही 13.07 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय.. गत आठवड्यात पारा 18.04 पर्यंत पारा गेला होता. मात्र, आता उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या आठवड्यात थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान वर्तविला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *