महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ जानेवारी ।। आज बाळासाहेब ठाकरेंची 99वी जयंती आहे.. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिक येऊ लागलेत. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त दोन्ही शिवसेनेचे आज मुंबईत मेळावे होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय. संध्याकाळी 6 वाजता हा मेळावा होणार असून मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.. तर BKCमध्ये शिवसेनेकडून शिवउत्सव शिवसेनेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात लाडक्या बहिणींच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाणार आहे.