Nitish Reddy Catch : नितीश रेड्डीने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ जानेवारी ।। भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना १३२ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने एक शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रेड्डीने घेतला भन्नाट झेल
तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू होती. त्यावेळी १७ वे षटक टाकण्यासाठी वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर बटलरने मोठा षटकार मारला. या शॉटनंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र यावेळी त्याचा प्रयत्न फसला. कारण चेंडूला उंची तर मिळाली पण चेंडू हवा तितका लांब गेला नाही. सक्वेअर लेगला असलेल्या नितीश रेड्डीने शानदार झेल घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *