GB Syndrome: पुण्यात जीबी सिंड्रोम हात पाय पसरतोय : रुग्णांची संख्या 59 तर 22 व्हेंटिलेटरवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। पुण्यात जीबी सिंड्रोमने थैमान घातलंय..तर 2 दिवसात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत अडीच पट वाढ झालीय. या आजाराचे कोणत्या वयोगटात किती रुग्ण आढळून आले आहेत आणि या आजारापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

अवघ्या 2 दिवसात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराच्या रुग्णांमध्ये तब्बल अडीच पट वाढ झालीय…यात 38 पुरुष आणि 21 महिलांना या सिन्डोमची लागण झालीय…एवढंच नाही तर 59 रुग्णांपैकी २२ जण व्हेंटिलेटवर आहेत. कोणत्या वयोगटात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे किती रुग्ण आहेत? पाहूयात .

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचं थैमान

0 ते 9 या वयोगटातील 4 मुली आणि 7 मुलांना जीबी सिंड्रोमची लागण

10-19 वयोगटातील 4 मुली आणि 8 मुलं

20 ते 29 या वयोगटातील 1 महिला आणि 6 पुरुष

30 ते 39 वयोगटातील 3 महिला 5 पुरुष

40 ते 49 वयोगटातील 3 महिला आणि 5 पुरुष रुग्ण

50 ते 59 वयोगटात 2 महिला आणि 5 पुरुष

60 ते 69 वयोगटातील 3 महिला आणि 4 पुरुष

70 ते 79 वयोगटातील 1 महिलेला हा आजार झाला आहे.

गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. तर दुषित पाण्यामुळे हा आजार होत असल्यांच सामोर आल्यानं पुणे महापालिकेने टास्क फोर्सची स्थापना करत पाण्याचे नमुने तपासायला सुरुवात केलीय. पुणे महापालिका परिसरात 11, पुणे ग्रामीणमध्ये 33, तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत… त्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलंय.. मात्र या गुइलेन बॅरी सिंड्रोमपासून वाचवण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी? पाहूयात.

हे करा, गुइलेन बॅरी सिंड्रोम टाळा
पाणी उकळून थंड करून प्या

शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने हात स्वच्छ धुवा

भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा

मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा

कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा

गुईलेन-बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा तुमचे स्नायू कमकुवत वाटायला लागले असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *