महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। विधानसभा निवडणुकींपासून चर्चेत असणाऱ्या एसटी महामंडळाच्या दरवाढीला अखेर नव्या वर्षात मंजुरी मिळाली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. एसटीच्या तिकिट दरांमध्ये १५ टक्केंनी वाढ झाली आहे. नवे तिकिट दर कधीपासून लागू होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच एसटी महामंडळाकडून नवीन तिकट दर लागू कऱण्यात येईल.
एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ कऱण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. गुरुवारी झालेल्या मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकराणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी ७० ते ८० रूपयांनी महागणार आहे. १०० रूपयांचे तिकीट आता ११५ रूपयांना मिळेल.