महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जानेवारी ।। प्रजासत्ताक दिन देशभरात अपूर्व उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विट्ठल-रखुमाईच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक वस्त्रांचा व दागिन्यांचा साज घालण्यात आला असून गळ्यात तिरंगी उपरणे घालण्यात आले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयन रम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे.मंदिरामध्ये विठ्ठल मूर्तीसोबतच रुखूमाई गाभाऱ्यात उपरणे घालून सजावट करण्यात आली आहे.श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा व नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, कामिनी आदी फुलांची सजावट करण्यात आली आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आलेल्या सजावटीमध्ये 1 टन फुलांचा समावेश आहे. ही सजावट 15 कामगारांनी केली आहे.
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीसाठी सुमारे एलईडी बल्ब 100 माळा, 25 फोकस व 100 ट्यूब चा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे