महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जानेवारी ।। महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या गडावर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली. श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे खंडोबा मंदिरास तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच मुख्य गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. गडकोटामध्ये भारत मातेची प्रतिकृती तयार करून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
यावेळी देव संस्थांनचे विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, व्यवस्थापक आशिष बाठे, अधिकारी बाळा खोमणे, महेश नाणेकर, गणेश डिखळे पूजारी सेवेकरी व कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिकृतीला फुलांची उधळण करीत भारत माता की जय, वंदे मातरम व येळकोट-येळकोट जय मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या.