महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जानेवारी ।। मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव उच्चांकावर गेले होते. मात्र चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं घसरलं आहे. 
सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये तोळ्यामागे १७० रुपयांची घसरण झाली आहे. ही घसरण आठडाभर चालू राहते का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. सोमवारचा १०० ग्रॅम सोन्याचा दर ८ लाख २४ हजार इतका आहे. गुड रिटर्नस् पोर्टलने सोन्याच्या घसरणीबद्दल माहिती दिली.
कोणत्या शहरात किती भाव?
मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ८ हजार २२५ इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७ हजार ५४० इतका आहे. पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ८ हजार २२५ इतका आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७ हजार ५४० इतका आहे. तर सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,५४० इतका आहे आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ८, २२५ इतका आहे. तसेच नागूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूरमध्ये असेच भाव आहेत.
एका तोळ्याचा भाव काय?
सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सोन्याच्या एका तोळ्याचा भाव, म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव ८२ हजार ४०० इतका आहे. २४ कॅरेट सोन्यााच हा भाव आहे. १०० ग्रॅमसाठी ८ लाख २४००० रुपये मोजावे लागतली. तर एका ग्रॅमसाठी ८ हजार २४० रुपये मोजावे लागतील.
दरम्यान, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला सोन्याच्या दरांमध्ये घसरण दिसून आली होती. त्यामुळे ग्राहकांनी सोन्याच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिलं. दोन आठवड्यांपासून सोन्याने पुन्हा उसळी मारली आहे. स्मार्ट गुंतवणूकदार हे थेट सोनं खरेदी करण्यापेक्षा कमोडिटी मार्केट आणि ईटीएफचा पर्याय निवडत आहेत.