महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जानेवारी ।। आरटीईअंतर्गत मुलांच्या प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी अडीच लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख येत्या रविवारपर्यंत आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी अर्ज केले नाहीत ते रविवारपर्यंत अर्ज करु शकतात. (RTE Admission)
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यात राज्यातील ८८६३ शाळांमधील एकूण १ लाख नऊ हजार १११ रिक्त जांगासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. त्यासाठी आतापर्यंत दोन लाख ६१ हजार ३०७ अर्ज आले आहेत.
या प्रक्रियेअंतर्गत लहान मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे येत्या रविवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (२००९) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.
दरम्यान, अधिकाधिक पालकांच्या बालकांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी आता रविवारपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामुळे, पालकांनी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावेत. ही अंतिम मुदतवाढ असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही.