Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार! थेट विमानसेवाही पूर्ववत होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जानेवारी ।। भारत आणि चीनमधील सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. अशातच दोन्ही देशांच्या या प्रयत्नांना यश मिळण्यास सुरुवात केली आहे. चीनने हा वाद सोडवण्यासाठी एक पाऊल टाकलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कैलास मानसरोवर यात्रा पु्न्हा सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्त्वतः करार झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे की भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी, ते अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही दशांमधील संबंध बिघडले आहेत. डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून भाविक उत्तराखंडच्या व्यास खोऱ्यातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येत होतो.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये कझान (रशियातील शहर) येथे झालेल्या बैठकीत यावर सहमती झाली होती. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच, उभय देशांचे संबंध स्थिर करण्यासाठी, पूर्ववर करण्यासाठी काही लोककेंत्रित पावलं उचलण्यावर सहमती झाली आहे. याअंतर्गत दोन्ही देशांनी २०२५ च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि चीन यांच्यातील बैठकीसाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे २६ आणि २७ जानेवारी रोजी बीजिंग दौऱ्यावर गेले होते. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी या दोघांमध्ये उभय देशांचे संबंध सुधारण्यावर बरीच चर्चा झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वांग यी यांनी बीजिंगमध्ये विक्रम मिस्री यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान चीन – भारत संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्यावर भर दिला असल्याचं सांगितलं.

थेट हवाई सेवा सुरू होणार
सीमापार नद्यांशी संबंधित इतर सहकार्यावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन तज्ज्ञ स्तरावरील बैठक घेण्याचेही मिस्री व वांग पी यांनी मान्य केले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने बांधलेल्या धरणाबाबत भारताने या बैठकीत आपली चिंता व्यक्त केली. तसेच उभय देशांमधील थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यावर तत्त्वतः सहमती झाली आहे. याबाबत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितलं की भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी लोककेंद्रित पावलं उचलण्यास आम्ही दोन्ही पक्ष (दोन्ही देशांमधील सरकार) सहमत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *