Gold Price Today: सोन्याचा ऐतिहासिक उच्चांक : पाहा काय झाला भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जानेवारी ।। नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या दिसत आहेत. अर्थसंकल्पापूर्वी मागणीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतींनी डबल धमाका करत फ्युचर्स (MCX) तसेच सराफा बाजारात आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८३,७५० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला तर सराफा बाजारात ८०,४०० प्रति १० ग्रॅमवर उसळले आहे.


डॉलर निर्देशांकातील घसरणीचा परिणाम आता सोन्याच्या किमतींवर स्पष्ट दिसून येत असून राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे, MCX वर देखील सोन्याने उच्चांकी झेप घेतली आहे. अशाप्रकारे आता सोन्याचा भाव प्रति १० ग्राम किती वाढला जाणून घेऊया. भारतीय बाजारात सोन्याने एकीकडे विक्रमी झेप घेतली तर त्यापाठोपाठ चांदीने देखील आपला रंग दाखवला. सोन्याने पुन्हा एकदा प्रति १० ग्रॅम ८३ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला तर चांदीचा दरही प्रति किलो ९३ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याचा ऐतिहासिक उच्चांक
मागील आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी दिल्ली सराफा बाजारात मोठी तेजी दिसून आली आणि सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला. त्याआधी सोमवार आणि मंगळवारी सोन्याच्या किमती २६० रुपयांची कमी झाल्या होत्या तर, बुधवारी सोन्याच्या किंमत विक्रमक पातळीवर उसळली आणि इतकी वाढली की दिल्लीत सोन्याचा दर ८४ हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला. त्याचवेळी, याआधी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारातही सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले. परदेशी बाजारातही तेजीचा ट्रेंड दिसत असताना देशांतर्गत बाजारावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

MCX वर फेब्रुवारी सोन्याचा वायदा (फ्युचर्स) २२८ रुपयांनी वाढून ८०,५१७ रुपयांचा नवीन उच्चांकावर पोहोचला तर एप्रिल सोन्याचा वायदा प्रति १० ग्रॅम ८१,०९८ रुपये झाला आहे. अमेरिकी डॉलर निर्देशांकात वाढ आणि ग्राहकांची मागणीतील मंद आकडेवारीमुळे सोन्याच्या किमतीने उभारी घेतली. याशिवाय, जागतिक बाजारात कमोडिटी बाजारात सोन्याचा वायदा भाव प्रति औंस $२,७९४.७० वर स्थिर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *