महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जानेवारी ।। पिंपरी ।। अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि) म.राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० व्यक्तींचा PCMC TOP 10 हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११. ३० वा. कायनेटिक चे चेअरमन अरुण फिरोदिया व ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी दिली.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आकुर्डी येथील हॉटेल किरीयाड ( कुंदन ) येथे संपन्न होत असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अरुणजी फिरोदिया, चेअरमन कायनेटिक ग्रुप तसेच जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर तसेच स्वागत अध्यक्ष माननीय श्री शंकर जगताप आमदार चिंचवड विधानसभा , प्रमुख मान्यवर माननीय श्री श्रीरंग आप्पा बारणे (खासदार मावळ लोकसभा) माननीय श्री अण्णा बनसोडे (आमदार पिंपरी विधानसभा) माननीय उमाताई खापरे (आमदार विधान परिषद तसेच माननीय आमदार श्री महेश लांडगे (भोसरी विधानसभा) श्री अमित गोरखे (आमदार विधान परिषद)
या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये प्रमुख 10 पुरस्कार्थी खालील प्रमाणे
१ श्रीकृष्णकुमार गोयल (सहकार व उद्योग क्षेत्र) माननीय
२ श्री लक्ष्मण गोफणे (प्रशासन)
३ श्री विजय जगताप
(लेखक व सामाजिक क्षेत्र)
४ श्री ऋतुराज गायकवाड (भारतीय क्रिकेटपटू)
५ श्री इरफान सय्यद
(कामगार क्षेत्र)
६ डॉ श्री बी सी डोळस
(वैद्यकीय क्षेत्र)
७ श्री गणेश यादव
(पत्रकारिता)
८ श्री संदीप साकोरे
(कला व नाट्य क्षेत्र)
९ सौ अंजू सोनवणे
(प्रेरणादायी रक्तदाते)
१० पीसीईटी रेडिओ एफएम (प्रसार व मनोरंजन क्षेत्र)
सदर पुरस्कार सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केलेले आहे