Union Budget 2025: करदात्यांसाठी आनंदाची बातमी, ITR भरण्याची मुदत वाढू शकते? नक्की खरं काय ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जानेवारी ।। अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळणार असल्याची चर्चा आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत वाढवण्याची मागणी होत आहे. अशातच २०२५च्या अर्थसंकल्पात टॅक्स भरण्याबाबत दिलासा मिळणे अपेक्षित आहे. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख सरकार वाढवू शकते. आर्थिक वर्षानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी करदात्यांची दीर्घकाळापासून मागणी आहे. सध्या आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.

सध्या ३१ जुलैपर्यंत टॅक्स रिटर्न भरावे लागत आहे. यासाठी त्यांना १५ जूनपर्यंत त्यांचा फॉर्म १६ प्राप्त करायचा असतो. अशा प्रकारे करदात्याला केवळ ४५ दिवसांचा वेळ मिळतो. आता काही लोक म्हणतील की ४५ दिवस पुरेसे आहेत. पण काहींना कागदपत्रे गोळा करण्यासाठी खूप वेळ लागतो. यामुळे करदाते इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तारीख वाढवण्याची मागणी करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यात बदल होणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विलंब झाल्यास मोठा दंड भरावा लागतो
जर करदात्याने ३१ जुलै नंतर आयकर रिटर्न भरला. किंवा आयकर रिटर्न टॅक्स भरण्यास विलंब झाला, तर अशा स्थितीत दंड भरावा लागतो. जर आपण ३९ डिसेंबरपर्यंत आयकर रिटर्न भरले तर तुम्हाला १,००० रुपये दंड भरावा लागेल. तर ३० डिसेंबरनंतर आयकर रिटर्न टॅक्स भरल्यास ५ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

काय आहेत मागण्या?
आयकर रिटर्न भरण्याची तारीख ३१ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यामुळे करदात्यांना पुरेसा वेळ मिळेल. याशिवाय, उशीरा रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवल्याने करदात्यांना परदेशी उत्पन्न आणि कर क्रेडिट माहिती योग्यरीत्या दाखल करण्याची संधी मिळेल. हे त्यांना दंड आणि व्याज टाळण्यास मदत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *