New Rules: १ फेब्रुवारीपासून ‘हे’ ५ मोठे होणार बदल; कार महागणार, बँकेचे नियम बदलणार, सामान्य नागरिकांना फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जानेवारी ।। उद्यापासून नव्या महिन्याला सुरुवात होणार आहे. याशिवाय उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच नवीन महिन्यात काही नवीन बदलही होणार आहेत. हे होणार बदल आर्थिकदृष्ट्या संबंधित असणार आहेत.

उद्यापासून होणाऱ्या या बदलांचा परिणाम थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. पुढील महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. हे बदल कोणते असणार आहेत ते जाणून घेऊया.

LPG च्या किमतींमध्ये बदल
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला देशभरात एलपीजीच्या किमती सुधारल्या जातात. तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होणार की वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सिलिंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

UPI शी संबंधित नियम
यंदाच्या नव्या महिन्यात यूपीआयशी संबंधित नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही UPI व्यवहार ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होतील. पुढील महिन्यात 1 फेब्रुवारीपासून, विशेष कॅरेक्टर्स असलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत.

मारूतीच्या गाड्या होणार महाग
गाडी घेणाऱ्यांना उद्यापासून फटका बसण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्च लक्षात घेऊन या वर्षी 1 फेब्रुवारीपासून आपल्या कारच्या विविध मॉडेल्सच्या किमती 32,500 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. ज्या मॉडेल्सच्या किमती वाढतील त्यामध्ये Alto K10, S-Presso, Celerio, Wagon R, Swift, DZire, Brezza, Ertiga, Eeco, Ignis, Baleno, Ciaz, XL6, FrontX, Invicto, Jimny आणि Grand Vitara यांचा समावेश आहे.

बँकेच्या नियमांमध्ये होणार बदल
कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या ग्राहकांना 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होणाऱ्या सामान्य सुविधा आणि शुल्कांमधील आगामी बदलांबद्दल माहिती दिलीये. यामध्ये मोफत एटीएम व्यवहार मर्यादा आणि विविध बँकिंग सेवांसाठी अपडेटेड फीस यांचा समावेश आहे.

ATF च्या दरामध्ये होणार बदल
1 फेब्रुवारीपासून एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एअर टर्बाइन इंधनाच्या किमती सुधारतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *