Budget 2025: भारतातील एकमेव राज्य जिथे 1 रुपयाही टॅक्स नाही घेतला जात!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जानेवारी ।। Sikkim Tax Free State: 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. देशातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते सर्वात श्रीमंत नागरिकापर्यंत सर्वजण वेगवेगळ्या रुपात सर्वांना टॅक्स भरावा लागतो.आपण दिलेल्या टॅक्सच्या उत्पन्नातूनच नागरिकांना आरोग्य, इन्फ्रा अशा विविध सुविधा दिल्या जातात. त्यामुळे भारतात कर भरणे भरणे प्रत्येकाला कायद्याने बंधनकारक आहे.

टॅक्स वाचवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र भारतात एक असे राज्य आहे जे पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. इथं करोडो रुपये कमावणाऱ्यांना देखील एक रुपयाचाही टॅक्स भरावा लागत नाही. जाणून घेऊया हे राज्य कोणते आहे.

सिक्कीम हे भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य आहे. सिक्कीम या राज्याला भारतीय प्रजासत्ताकात विशेष दर्जा प्राप्त जाला आहे. यामुळे येथील नागरिकांना करातून 100 टक्के सूट मिळते.इथे लोक कितीही कमावत असले तरी त्यांना आयकर भरावा लागत नाही. भारतीय संविधानाच्या कलम 371(F) आणि आयकर कायदा 1961 च्या कलम 10(26AAA) अंतर्गत सिक्कीम राज्यात ही सुविधा लागू करण्यात आली आहे.१९७५ मध्ये सिक्कीमला हा करमुक्त विशेष दर्जा मिळाला. त्यावेळेस सिक्कीम हे राज्य भारतीय संघराज्यात सामील झाले नव्हते. सिक्कीमची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि तेथील नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे हा या विशेष अधिकाराचा उद्देश होता.सिक्कीममधील नागरिकांना मिळणारी ही कर सवलत फक्त आयकरातून तसेच वैयक्तिक उत्पन्नापुरती मर्यादित नाही, तर ही रोख्यांवर मिळणारे व्याज आणि लाभांशावरही लागू होते.

सिक्कीम करमुक्त ठेवण्याचा निर्णय राज्याच्या आर्थिक विकासासाठी उपयुक्त ठरला आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तर, पर्यटन हा देखील राज्यातील प्रमुख व्यवसाय आहे.सर्व व्यवहार करमुक्त होत असल्याने नागिकांना कमाईची मोठी संधी मिळते. ज्यामुळे त्यांची बचत होऊन त्यांना अधिक गुंतवणुक करता येते. या धोरणामुळे राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे.सिक्कीमचे हे करमुक्त मॉडेल देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. इतर राज्यांनीही अशी धोरणे स्वीकारल्यास भारताची एकूण आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *