Guillain-Barre Syndrome: GBS चा महाराष्ट्रात कहर! पुण्यात रुग्णसंख्या 130 वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जानेवारी ।। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गीया बार्रे सिंड्रोम या आजाराने वेगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुण्यात गीया बार्रे सिंड्रोमच्या संशयित रुग्णांची संख्या 130 रुग्णांची नोंद झाली असून या पैकी 73 रुग्णांचे गीया बार्रे सिंड्रोमचे निदान झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटर वर असून उपचार घेत आहेत. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 1500 हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आल असून 8 दिवसात रुग्णांची शंभरी पार केली आहे. राज्यात गीया बार्रे सिंड्रोम चे रुग्ण वाढत असल्याने आता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर अली आहे.

कमी वयोगटातील आहे रुग्ण
पुण्यातील गिया बार्रे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत 30 रुग्ण हे 20 ते 29 वयोगटातील आहेत. तर, शून्य ते नऊ वयोगटातील 22 मुलांना गिया बार्रे सिंड्रोम बाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत, 121 स्टूलचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) कडे पाठवण्यात आले आहेत आणि त्या सर्वांची ‘एंटेरिक व्हायरस पॅनल’साठी चाचणी करण्यात आली आहे.

अकोल्यातही झाला शिरकाव
अकोल्यातही या आजराचा शिरकाव झाला असून गिया बार्रे सिंड्रोमचे 4 रुग्ण आढळले आहे. यामुळे अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रविवारी सोलापुरात एका 40 वर्षीय व्यक्तीचा गिया बार्रे सिंड्रोममुळे संशयास्पद मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पुण्यातील एका ५६ वर्षीय महिलेचा शासकीय ससून सामान्य रुग्णालयात गिया बार्रे सिंड्रोममुळे मृत्यू झाला. तिला इतर अनेक आजारांनी ग्रासले होते.’

काय आहेत गिया बार्रे सिंड्रोमची लक्षणं?
गिया बार्रे सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक बधीरपणा आणि स्नायू कमकुवत होतात. हा एक दुर्मिळ स्वयंप्रतिकार रोग आहे. डॉक्टरांच्या मते, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यत: गिया बार्रे सिंड्रोम होतो. याचे कारण ते रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात आणि सध्याच्या परिस्थितीत, हा रोग दूषित पाण्यामुळे सुरू झाल्याचा संशय आहे. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. या स्थितीमुळे ग्रस्त असलेल्या बहुतेक लोकांना रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *