महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ फेब्रुवारी ।। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. नोकरदार, शेतकरी, महिला आणि तरूणांसाठी अर्थसंकल्पात विविध तरतूदी करण्यात आल्या. निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही भरीव तरदूत करण्यात आली. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तब्बल २ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 6640 कोटींची तरतूद आहे. रेल्वेकडून मोदी सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले.
२०० नव्या वंदे भारत ट्रेन (यामध्ये ५० वंदे भारत स्लीपर ट्रेन), १०० अमृत भारत ट्रेन, ५० नमो भारत रॅपीड रेल आणि १७५०० बोगी (नॉन एसी) पुढील दोन तीन वर्षांत रेल्वेकडून सेवेत येणार असल्याची माहिती देण्यात आली. २०२५-२५ या आर्थिक वर्षात रेल्वेकडून अनेक नव्या गाड्या आणि सोयी सुविधा देण्यात येतील, असेही रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
२०२५-१६ आर्थिक वर्षात रेल्वेसाठी अर्थसंकल्पात काय काय?
रेल्वेगाड्या, बोगींसाठी 45 हजार 530 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नव्या रेल्वेमार्गांसाठी 32 हजार 235 कोटींची तरदूत करण्यात आली.
रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणासाठी 32 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
रेल्वेचे गेज बदलण्यासाठी 4 हजार 550 कोटी
रेल्वे सेवा,यार्ड आधुनिकीकरण व इतर कामांसाठी 8 हजार 601 कोटी तरतूद केली आहे.
रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणासाठी 22 हजार 800 कोटी
रेल्वे सिग्नल आणि टेलिकॉमसाठी 6 हजार 800 कोटींची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे.
रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणासाठी 6 हजार 150 कोटी
रेल्वे पूल, बोगदे व अन्य बांधकामांसाठी 2 हजार 169 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद