महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ फेब्रुवारी ।। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) थरार यावेळी पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने यूएईमध्ये होतील. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत कोणता संघ बाजी मारेल, याबाबत भाकित व्यक्त केलं आहे.
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कोणता संघ वरचढ ठरेल, याची भविष्यवाणी केली आहे. रवी शास्त्री आणि रिकी पॉन्टिंग यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये होईल, अशी भविष्यवाणी केली आहे. तर इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचतील, असं भाकितही रवी शास्त्रीने व्यक्त केलं आहे. दरम्यान, 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत विश्वचषक पटकावला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत कोणते संघ पोहोचतात हे पाहणे मनोरंजक असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ (Team India Squads Champions Trophy 2025) –
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्सर पटेल, हार्दिक पांड्या, वाॅशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत आणि रविंद जडेजा.
आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई*
5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर**
9 मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर**
सर्व सामने पाकिस्तानी वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील..
उपांत्यपूर्व 1 मध्ये भारत पात्र ठरला तर सामील होईल
पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी 2 मध्ये सामील होईल
जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला जाईल.