Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेन धावणार, तिकीट किती? कुठे थांबणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ फेब्रुवारी ।। नागपूरला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नागपूर विभागाने वंदे भारत एक्सप्रेससाठी भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवलाय. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यामार्गावर स्लीपर वंदे भारत मिळावी म्हणून हा प्रस्ताव पाठवल्याचे समोर आलेय.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकारी (डीआरएम) विनायक गर्ग यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत वंदे भारत ट्रेन विषयी दुजोरा दिलाय. विनायक गर्ग यांनी रेल्वे नेटवर्कमध्ये नागपूरचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले होते. ते म्हणाले, “नागपूर विभाग प्रवाशांच्या रेल्वेच्या नेटवर्क वाढीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जवळपास 125 हून अधिक गाड्या नागपूर स्थानकातून धावतात. लवकरच नागपूरवरून वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्याची शक्यता आहे.

• नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Secunderabad Vande Bharat Express

• नागपूर -इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Indore Vande Bharat Express

• नागपूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Bhopal Vande Bharat Express

कोणत्या नव्या मार्गावर वंदे भारत धावण्याची शक्यता ? Proposed new routes:

• नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Pune Vande Bharat Express

• नागपूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस Nagpur-Mumbai Vande Bharat Express

वंदे भारत मेट्रो ट्रेन
नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. प्रवाशी जास्त आणि रेल्वे कमी आहेत, त्यामुळे वंदे भारत ट्रेन आल्यास मोठा फायदा होऊ शकतो. नागपूर-पुणे या मार्गावर मर्यादीत ट्रेन असल्यामुळे अनेकजण रस्ते मार्गाने प्रवास करतात. जर आरामदायी वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा कल याकडे जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेळेची बचत होणार आहे.

नागपूर-पुणे, सध्या रेल्वे कोणत्या आहेत? At present, Nagpur-Pune connectivity is limited to:

• नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस (आठवड्यातून तीन वेळा) Nagpur-Pune Superfast Express

• गरीब रथ एक्स्प्रेस (आठवड्यातून तीन वेळा) Garib Rath Express (3 times a week)

• हमसफर (आठवड्यातून एकवेळा) Humsafar Express (once a week)

• आझाद हिंद एक्सप्रेस आणि हातिया-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस Azad Hind Express & Hatia-Pune Superfast Express.

नागपूर आणि मुंबई या मार्गावर फक्त दोन ट्रेन धावतात. त्यामध्ये विदर्भ एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे.

नागपूर-पुणे वंदे भारत सुरू झाल्यास कोणता थांबा मिळणार?

नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्याप नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनच्या तिकिटासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मर्यादीत रेल्वे असल्यामुळे प्रवाशांना तिकिट मिळत नाहीत. त्यामुळे ते रस्ते मार्गाने प्रवास करतात. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास वेळ आणि पैसे दोन्ही वाचेल. वंदे भारत एक्सप्रेस इतर ट्रेनच्या तुलनेत वेगवान आणि आरामदायी आहे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *