महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ फेब्रुवारी ।। .केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, जगात अनेक देश असे आहेत जिथं सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत हा आयकर आहे. तर असेही काही देश आहेत जे केवळ अप्रत्यक्ष कर आकारतात. इतर कोणताही कर द्यावा लागत नाही. हे देश वस्तू आणि सेवांवर कर लावतात. यात अनेक मुस्लिम देशांचा समावेश आहे.
सौदी अरेबिया
सौदी अरेबियात नागरिकांवर कराचं कोणतंच ओझं नाही. मात्र अप्रत्यक्ष कर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. अप्रत्यक्ष करातूनच सौदीची अर्थव्यवस्था भक्कम होते. सौदी अरेबियाचं नाव समृद्ध अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये घेतलं जातं.
युएई
संयुक्त अरब अमिरातीतसुद्धा नागरिकांकडून आयकर घेतला जात नाही. व्हॅल्यू एडेड टॅक्स किंवा वस्तुंवर करा या माध्यमातून अप्रत्यक्ष कर वसूल केला जातो. युएईची अर्थव्यवस्था भक्कम अशी आहे. यामध्ये पर्यटनाचा वाटाही मोठा आहे. त्यामुळे लोकांवर आयकर लादलेला नाही.
कुवैत
कुवैत हा देशही असा आहे जिथं आय़कर द्यावा लागत नाही. या देशाची अर्थव्यवस्था तेलावर आधारीत आहे. तेल निर्यातीच्या माध्यमातून कुवैतला पैसे मिळतात. यामुळे या देशात नागरिकांकडून आयकर वसूल करण्याची गरज पडत नाही.
बहरीन
बहरीनमध्येही आयकर द्यावा लागत नाही. इथंही सरकार अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून कर वसूल करते. लहान व्यवसाय आणि स्टार्टअप्सना यामुळे मोठी मदत होते. लोकांची क्रयशक्ती वाढते तेव्हा अप्रत्यक्ष करही जास्त वसूल होतो.