![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात आला आहे. दरम्यान, आता फेब्रुवारी महिन्याला हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Ladki Bahin Yojana)

२० दिवसात येऊ शकतात पैसे
लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. परंतु या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही कदाचित हप्ता येऊ शकतो. त्यामुळे २० दिवसांमध्येही कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. (Ladki Bahin Yojana February Month Installment)
फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा आहे. त्यामुळे कदाचित २० तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मागील तीन महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे येत होते. त्यामुळे या महिन्यातही पैसे तेव्हाच येऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे महिलांना घाबरुन अर्ज माघारी घेतले आहेत. अपात्र महिलांनी अर्ज माघारी घ्यावेत, असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं होतं. त्यानंतर हजारो महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची तपासणी सध्या सुरु आहे