राष्ट्रीय समाज पक्षाच्या शहराध्यक्षपदी परमेश्वर बुर्ले यांची निवड.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी चिंचवड शहर आयोजित कार्यकर्ता मेळावा व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.हनूमान मंदिर हॉल कृष्णानगर येथे झालेल्या मेळाव्यात पक्षाच्या शहराध्यक्षपदी परमेश्वर बुर्ले यांची निवड करण्यात आली.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड केली. बुर्ले यांच्या सोबत संघटकपदी शिवाजी बिटके, संपर्कप्रमुख पदी भाऊसाहेब हरणावळ, महिला आघाडी अध्यक्षपदी कौसल्या सोलनकर तर विध्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी सानिया तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे,सुनिता किरवे, विनायक रुपनवर, कालीदास गाढवे ,नाना गावडे, वैशाली जाधव उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष शेवते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रनायक मा श्री महादेव जानकर यांचे विचार व कार्य घरोघरी पोहचवा.येणारी निवडणूक ताकदीने लढवण्याचे आदेश दिले व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक रोळे, अभंग देवकते, विठ्ठल हरणावळ व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक अजित चौगुले यांनी केले.राष्ट्रीय समाज पक्षाच्या शहराध्यक्षपदी परमेश्वर बुर्ले यांची निवड.
राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी चिंचवड शहर आयोजित कार्यकर्ता मेळावा व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.हनूमान मंदिर हॉल कृष्णानगर येथे झालेल्या मेळाव्यात पक्षाच्या शहराध्यक्षपदी परमेश्वर बुर्ले यांची निवड करण्यात आली.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड केली. बुर्ले यांच्या सोबत संघटकपदी शिवाजी बिटके, संपर्कप्रमुख पदी भाऊसाहेब हरणावळ, महिला आघाडी अध्यक्षपदी कौसल्या सोलनकर तर विध्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी सानिया तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे,सुनिता किरवे, विनायक रुपनवर, कालीदास गाढवे ,नाना गावडे, वैशाली जाधव उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष शेवते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रनायक मा श्री महादेव जानकर यांचे विचार व कार्य घरोघरी पोहचवा.येणारी निवडणूक ताकदीने लढवण्याचे आदेश दिले व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक रोळे, अभंग देवकते, विठ्ठल हरणावळ व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक अजित चौगुले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *