फोर्ब्सच्या शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत टॉप १०मधून बाहेर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। फोर्ब्सने २०२५मध्ये जगातील १० सर्वात शक्तीशाली देशांची रँकिंग जाहीर केली आहे. यात भारताला टॉप १०मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. ही यादी अनेक बाबतीत महत्त्वाची आहे कारण भारतासारख्या विशाल जनसंख्या, चौथे सर्वात मोठे सैन्य आणि पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाला टॉप १०मधून बाहेर ठेवण्याबाबत मोठे सवाल उपस्थित केले जात आहेत.


फोर्ब्सने सांगितले की ही यादी यूएस न्यूजकडून तयार करण्यात आली आहे आणि रँकिंगसाठी पाच मुख्य बाबींचा वापर केला गेला आहे. या यादीला कोणत्याही देशातील नेते, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, मजबूत आंतरराष्ट्रीय संघटन आणि मजबूत सैन्याच्या आधारावर ठरवले जाते.

या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. अमेरिकेचा जीडीपी ३०.३४ ट्रिलियन डॉलर असून लोकसंख्या ३४.५ कोटी आहे. त्यानंतर चीनचा नंबर लागतो. चीनचा जीडीपी १९.५३ ट्रिलियन डॉलर आहे. त्यांची लोकसंख्या १४१.९ कोटी आहे. रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा जीडीपी २.२ ट्रिलियन डॉलर आहे. तर लोकसंख्या १४.४ कोटी आहे. चौथ्या स्थानावर युके आहे. त्यांचा जीडीपी ३.७३ ट्रिलियन डॉलर आहे. तर लोकसंख्या ६.९१ कोटी आहे. पाचव्या स्थानावर जर्मनी आहे. त्यांचा जीडीपी ४.९२ ट्रिलियन डॉलर आहे तर लोकसंख्या ८.४५ कोटी आहे. दक्षिण कोरियाचा नंबर सहावा आहे. त्यांचा जीडीपी १.९५ ट्रिलियन डॉलर आहे तर ५.१७ कोटी लोकसंख्या आहे. फ्रान्स सातव्या स्थानावर आहे. त्यांचा जीडीपी ३.२८ ट्रिलियन डॉलर आहे तर लोकसंख्या ६.६५ कोटी आहे. जपान आठव्या स्थानावर आहे. त्यांचा जीडीपी ४.३९ ट्रिलियन डॉलर आहे. तर लोकसंख्या १२.३७ कोटी आहे. सौदी अरेबिया १.१४ ट्रिलियन डॉलर आणि ३.३९ कोटी लोकसंख्येसह नवव्या स्थानावर तर इस्त्रायल ५५०.९१ बिलियन डॉलर जीडीपी आणि ९३.८ लाख लोकसंख्येसह दहाव्या स्थानावर आहे.

भारताला टॉप १० मधून बाहेर करण्याबाबत सवाल
भारताची मोठी लोकसंख्या, सैन्याची ताकद आणि आर्थिक प्रगती पाहता त्यांना या यादीतून बाहेर ठेवणे हे हैराणजनक आहे. भारताकडे जगातील चौथे सर्वात मोठे लष्कर आणि पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असतानाही रँकिंगमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. यावरून अनेक तज्ञांनी तसेच नागरिकांच्या मनात सवाल उभे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *