महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ फेब्रुवारी ।। पुण्यात जीबीएस आजाराचा विळखा वाढतच चाललाय, दिवसागणिक रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी पुण्यात पाच संशयीत रूग्णाची भर पडली, त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १६३ वर पोहचली आहे. यामधील ४७ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर इतरांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रूग्णांमधील ४७ जण आयसीयूमध्ये आहेत.
पुण्यात जी बी एस रुग्णाची संख्या १६३ वर पोहचली आहे. सोमवारी पुण्यात पाच नव्या रूग्णांची भर पडली आहे. पुण्यात आतापर्यत पाच जीबीएस रूग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. आयसीयूमध्ये असणाऱ्या ४७ रूग्णांपैकी २१ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून जीबीआस आजाराने पुण्यात थैमान घातलेय, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन कऱण्यात आलेय.
वाढत्या जीबीएस आजाराची कारणे काय? याबाबत आत्ता पशूसंवर्धन विभागाच्या वतीने फक्त पाणीच नव्हे तर विविध पक्षी, पोल्ट्रीफॉर्म आणि मातीचे सँपल घेऊन नेमकं हा आजार का वाढत आहे, याबाबत संशोधन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालकांनी सोमवारी दिली आहे.पुणे महापालिका,राज्य शासन, तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध पथकांच्या माध्यमातून पाण्याचे नमुने देखील तपासण्यात आले आहे.
महापालिका भागातील ३२ रुग्ण, तर नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील ८६ रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील १८ रुग्ण, पुणे ग्रामीण भागातील १९ रुग्ण, इतर जिल्ह्यातील ८ असे एकूण १६३ रुग्ण आढळून आले आहे.तर १११ रुग्ण हे दवाखान्यात उपचार घेत आहे तर ४७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांचा डिस्चार्ज झाला आहे.जे १११ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे त्यातील ४७ रुग्ण आयसीयूमध्ये असून यातील २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.