महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ फेब्रुवारी ।। आतापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे.
पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तेव्हा, आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड (Aadhar Card) जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शिवाय, वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्यांना व डॉक्टर, इंजिनिअर आहेत, जे प्राप्तकर भरतात, पेन्शनर आहेत, त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जातो. डिसेंबर-२०१८ पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. आतापर्यंत १८ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे.
योजना सुरू झाली, त्यावेळी एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. कालांतराने सरकारच्या एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह जे निवृत्त कर्मचारी होऊन पेन्शन घेत आहेत, प्राप्तिकर भरत आहेत.
तसेच डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, आर्किटेक्ट आहेत आदींना लाभ मिळत असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. नवीन नियमांमुळे अनेकांचा या योजनेतून पत्ता कट होणार असून जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.