महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ फेब्रुवारी ।। १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली होती. पण आठवड्याच्या पहिल्या दिवशीच सोन्याच्या किमती घसरल्या. आता अर्थसंकल्पानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ४ फेब्रुवारी म्हणजे आज सोनं- चांदी स्वस्त झाले आहे. आज २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ४०० रुपयांनी घट झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये १०० रुपयांनी घट झाली आहे.
१० ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत ८४,१०० रुपयांच्या आसपास गेली आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क वाढवले नव्हते. यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. कुठेतरी सर्वसामान्य ग्राहकांनाही याचा फायदा झाला आहे. सोन्याचा भाव आता कमी होऊ लागला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अशांतता आणि अमेरिकेच्या धोरणांमधील बदलांमुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून त्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे त्याच्या किमती वाढल्या आहेत. जर व्याजदर कमी झाले आणि बाजारात अनिश्चितता कायम राहिली तर सोनं आणि चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात लग्न आणि सणांमध्ये सोन्याची मागणी वाढते त्यामुळे येत्या काही महिन्यांत त्याच्या किमती आणखी वाढू शकतात असे देखील म्हटले जात आहे.
आज चांदीच्या किमतीत देखील थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली. चांदीची किंमत प्रतिकिलो ९९,३०० रुपयांवर आली आहे. याआधी चांदीचा भाव ९९,४०० रुपये होता. त्यामुळे सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीमध्ये देखील काहिशी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदी करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तुमच्या शहरातील आजच्या किमती –
– मुंबई – २२ कॅरेट – ७७,०४० तर २४ कॅरेट – ८४,०४०
– दिल्ली – २२ कॅरेट – ७७,१९० तर २४ कॅरेट – ८४,१९०
– चेन्नई – २२ कॅरेट – ७७,०४० तर २४ कॅरेट – ८४,०४०
– कोलकाता – २२ कॅरेट – ७७,०४० तर २४ कॅरेट – ८४,०४०