महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष पतिनिधी – दि. १६ ऑगस्ट – ७४ व्या स्वातंत्रदिनानिमित्त अंध अपंग विकास असोसिएशन,अजंठानगर,चिंचवड येथे सकाळी १० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्री. बाळासाहेब गोतारणे (राष्ट्रवादी शिक्षण संघटना अध्यक्ष पिं.चि शहर ),श्रीमती. रेखाताई गोतारणे (माननीय शिक्षिका ),संस्थेचे सल्लागार श्री. चंद्रकांत जी सहाणे (उद्योजक ) यांच्या उपस्थिती मध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्यावेळी श्री.यशवंत कान्हेरे (सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीताचे गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
स्वातंत्रदिनाचे अवचित साधून कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे दिवंगत संथापक अध्यक्ष कै.श्री दिनकर रामचंद्र गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती.किरण दिनकर गायकवाड यांच्या हस्ते बारावी उत्तीर्ण जावेद अली मुजावर ह्या विद्यार्थाचा व इतर विद्यार्थाचा पुष्पगुछ देऊन तसेच सत्कार करण्यात आला.तसेच तेथील उपस्थित अंध विद्यार्थी व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.त्यावेळी श्री अनिल देशमुख ,संस्थेचे खजिनदार श्री प्रदीप गायकवाड ,संदीप देशमुख ,अलिसाब मुजावर ,अलोक गायकवाड ,स्मिता गायकवाड ,मीना सानप ,गणेश खरात ,कावेरी होवाळ,अरुण गायकवाड,सविता पगारे ,रुक्मिणी चट्टेवार ,जयराम दहातोंडे ,प्रकाश शिंदे ,बाबासाहेब बाठे ,विष्णू कांबळे यासर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच विष्णू कांबळे ह्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.