महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १७ ऑगस्ट – नागपूरच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती लीलावती रुग्णालय प्रशासनाने दिली. खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यासह पती रवी राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला.
खा. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सासू, सासरे, दोन मुले, आमदार राणा यांचा समावेश आहे. ६ आॅगस्टपासून नवनीत राणा व त्यांच्या पतीवर नागपूर वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. खा. नवनीत यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर १३ आॅगस्टला नागपूरहून त्यांना व त्यांच्या पतीला वांद्रेतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले होते.
