![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। नॅशनल हायवेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हायवेवरुन सतत प्रवास करणाऱ्यासाठी सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. सरकार लवकरच वार्षिक टोल पास देण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच तुम्हाला वर्षभरासाठी टोल पास मिळणार आहे.
आनंदाची बातमी म्हणजे वर्षभराच्या या पाससाठी फक्त तुम्हाला ३००० रुपये भरावा लागणार आहे.याचसोबत तुम्ही आजीवनदेखील पास मिळवू शकतात.म्हणजेच १५ वर्षांसाठी तुम्ही ३०,००० रुपयांचा पास देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी टोल भरण्याची गरज नाही. (Anuual And Lifetime Toll Pass)
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या वार्षिक आणि आजीवन टोल पासबाबत प्रस्ताव रस्ते मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. याबाबत सरकार विचार करत आहे. दरम्यान, नॅशनल हायवेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मंत्रालय खाजगी कारसाठी प्रति किली टोल दरात बदल करण्याच्या विचारात आहे, असंही सांगण्यात येत आहे.
नवीन पास खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही वेगळे करावे लागणार नाही. तुमच्या फास्टॅगमध्ये एम्बेड केले जाईल. सध्या स्थानिक प्रवाशांना एकच टोल प्लाझा ओलांडण्यासाठी मासिक पास दिले जातात. या पासची किंमत दर महिन्याला ३४० रुपये आहे. म्हणजेच वर्षासाठी ४,०८० रुपये आहे. त्यामुळेच हा नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे.
यामुळे संपूर्ण वर्षासाठी एका टोल प्लाझासाठी ३००० रुपयांची पास दिला जाऊ शकतो. यामुळे वाहनधारकांचे पैसेही वाचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितके की, कार मालकांना वार्षिक पास देण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. यामुळे अनेक समस्या दूर होतील.
२०२३-३४ मध्ये एकूण ५५,००० कोटी रुपये टोल महसूल जमा झाला आहे. त्यापैकी खाजगी गाड्यांचा टोल ८००० कोटी रुपये आहे. ५३ टक्के व्यव्हार हे खासगी कारसाठी झाले.
