महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। राज्यातल्या लाखो लाडक्या बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे. कारण चार चाकी गाडी असलेल्या लाडकींची यादीच पहिवहन खात्यानं जिल्हा परिषदांना सुपूर्द केलीय. आणि अंगणवाडी सेविकांनी या लाडकींची पडताळणी सुरू केलीय. एकट्या पुण्यात बोगस लाडकींचा आकडा ७५ हजारांवर गेलाय. आणि अजून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात लाडकींची आकडेवारी काय आहे ते पाहू यात.
पुण्यात 75 हजार बोगस लाडक्या?
– एकूण अर्ज – 21 लाख 11 हजार 991
– लाभार्थी लाडक्या – 20 लाख 89 हजार 946
– कारवाल्या लाडक्या – 75 हजार 100
– जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी कारवाल्या ‘बहिणीं’ची यादी
– अंगणवाडी सेविका ‘बहिणीं’च्या घरी जाऊन करणार पडताळणी
महिला आणि बालकल्याण विभागानं निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी कसून तपासणी सुरू केलीय. योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि तिजोरीवरचा भार हलका व्हावा यासाठी ही पडताळणी सुरू आहे. एकट्या पुण्यात 75 हजार बोगस लाडक्या सापडल्या असतील तर राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्य़ामुळे कारवाल्या लाडकींचा हप्ता तर बंद होणारच मात्र इतरही नियमबाह्य लाडकींची आता खैर नाही.