महाराष्ट्र २४ ई पेपर ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १३६ गावांना फटका बसणार आहे.
विशेष म्हणजे या महामार्गाला प्रचंड विरोध करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचाही या अलाइनमेंटमध्ये समावेश आहे. सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील १८ गावे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ६ तालुक्यांतील ६१ गावे यात समाविष्ट आहेत.
राज्य रस्ते विकास प्रधिकरणाने पर्यावरण विभागाच्या (Environment Department) ना हरकत प्रमाणपत्रासाठी या महामार्गाचे तीन वेगवेगळे प्रारूप आराखडे (अलाईनमेंट) तयार केले आहेत. पर्यावरण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडे महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (Maharashtra Road Development Authority) सादर केलेल्या ४८ पानी अहवालातून प्रथमच या महामार्गाची सर्वाधिक तपशीलवार माहिती समोर आली आहे.
पहिल्यात टप्प्यात सोलापूर जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ५५ गावे सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील १८ गावे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ६ तालुक्यांतील ६१ गावे, तसेच उर्वरित धाराशिव जिल्हा मराठवाड्याच्या टप्प्यात येत असला, तरी तुळजापूर तालुक्यातील दोन गावे पहिल्या टप्यात येत आहेत. पहिल्यासाठी तीन वेगवेगळ्या अलाइनमेंट तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण १३६ गावे बाधित होणार असून १३४ गावे पश्चिम महाराष्ट्रातील, तर दोन गावे मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील आहेत.
l
महामार्गाची वैशिष्ट्ये
पवनार ते पत्रादेवीपर्यंत सहापदरी महामार्ग
रेणुकादेवी, तुळजाभवानी, अंबाबाई ही शक्तिपीठ जोडणार
दर ५० किलोमीटरवर हॉटेल्स, धाबे, चार्जिंग स्टेशनची सुविधा
धार्मिक पर्यटन वाढ व उद्योगवाढ हे ध्येय
सांगली जिल्ह्यातील बाधित गावे शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नायगाव, कवठे एकंद, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी आदी.
सोलापूर जिल्ह्यातील बाधित गावे
बार्शी तालुका- गौडगाव, रातजंन, मालेगाव, अंबाबाईचीवाडी, जवळगाव, हत्तीज, चिंचखोपण, शेळगाव (आर.) उत्तर सोलापूर- कौठाळी, कळमण, पडसाळी, मोहोळ तालुका- मसलेचौधरी, खुनेश्वर, भोयरे, हिंगणी (निपाणी) मोहोळ, पोखरापूर, आढेगाव, सौंदणे, टाकळी सिकंदर, पंढरपूर तालुका- पुळुज, फुलचिंचोली, विटे, खरसोळी, आंबे, अनावळी, सातेफळ, खर्डी, सांगोला तालुका – मतेवाडी, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी, चिंचोळी, बामणी, एखतपूर, सांगोला, कमलापूर, अजनाळे, चिनके, वझरे, बाळेवाडी, नाझरेवाडी, चोपडे आदी.
कोल्हापूर जिल्ह्यातील गावे
हाती आलेल्या माहितीनुसार कोथळी, दानोळी, निमशिरगाव, चिपरी, तारदाळ, हातकणंगले, तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली, सांगवडे, सांगवडेवाडी, सावर्डे, हलसवडे, निरळी, कागल रस्ता- विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगिल बुद्रुक, एकोंडी, व्हन्नूर, सिद्धनेर्ली, बामणी, केनवडे, सावर्डे खुर्द, सावर्डे बुद्रुक, सोनाळी, कुरणी, निढोरी, आदमापूर, कूर, मळगे खुर्द, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, सोनाळी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, दासेवाडी, कारीवडे, धाबिल, शेळप, पारोळी, आंबेवाडी आदी.
पहिला टप्पा
(आकडे हेक्टरमध्ये)
एकूण आवश्यक
जमीन : ३७९०
खासगी शेत जमीन : ३६१९.२२
वन विभागाची जमीन : १९.४४
सरकारी जमीन : १५२.०३