Gold Silver Price: सोन्याची नव्वदी कडे वाटचाल ; काय आहे भाव वाढीचे कारण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ई पेपर ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 270 रुपयांनी वाढून 86,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. दुसरीकडे रुपयाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली आणि काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाले.

सराफा बाजारात 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 270 रुपयांनी वाढून 85,670 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले. मंगळवारी सोने 85,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

शेअर बाजारातील घसरण हेही एक महत्त्वाचे कारण
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, स्थानिक ज्वेलर्सची सततची खरेदी, कमकुवत रुपया आणि शेअर बाजारातील घसरण यामुळे यंदा सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणि जागतिक कल यामुळे सोन्याचा भाव 6,680 रुपये प्रति 10 ग्रॅम किंवा 8.41 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, चांदीचा भाव 96,500 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला.

काल रुपया 14 पैशांनी घसरला आणि अमेरिकन चलनाच्या तुलनेत 87.57 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. आज शुक्रवारी RBI चलनविषयक धोरणाचा आढावा जाहीर करेल. आढाव्यात व्याजदर कपातीच्या वाढत्या शक्यतांमुळे रुपयावर दबाव निर्माण झाला आहे. कमकुवत रुपयामुळे सोन्याची आयात महाग होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *