PF interest Rate: PF खात्यावरील व्याजदर वाढण्याची शक्यता; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ई पेपर ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स न लागणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी अजून एक घोषना होण्याची शक्यता आहे. टॅक्समध्ये सूट मिळाल्यानंतर पीएफबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ईपीएफओच्या केंद्रिय बोर्ड ट्रस्टीची २८ फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफवरील व्याज वाढवण्याची शक्यता आहे. या बैठकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु या बैठकीत ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

पीएफवरील इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता (PF Interest Rate May Increase)

भारत सरकारचे मुख्य लक्ष हे मार्केटमधील डिमांडला वाढवणे आहे. त्यामुळे १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स फ्री करण्यात आला आहे. यामुळेच सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. सर्वसामान्यांना अजून फायदा मिळवून देण्यासाठी पीएफबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

संगठीत क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. यातील काही पैसे हे पेन्शसाठी जमा केले जातात.

पीएफमधील गुंतवणूकीवर सर्वाधिक व्याज दिले जाते. २०२२-२३ मध्ये पीएफचा इंटरेस्ट ८.१५ टक्के होता. २०२३-२४ मध्ये तो वाढवून ८.२५ करण्यात आला. आता हे व्याजदर अजून वाढण्याची शक्यता आहे. (PF Interest Rate)

देशात जवळपास सात कोटींपेक्षा जास्त लोकांचे पीएफ खाते आहे. २०२३-२४ च्या रिपोर्टनुसार, ७ कोटी ३७ लाख लोकांचे पीएफ खाते आहे. याचसोबत पेन्शन फंडमध्ये पैसा जमा करणाऱ्यांची संख्या ८ लाख झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *