महाराष्ट्र २४ ई पेपर ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर नागरिकांना भविष्यात आर्थिक अडचण भासत नाही. केंद्र सरकारच्या योजना या सुरक्षित असतात. या योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो. अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगले व्याज मिळते. (Kisan Vikas Patra)
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला फक्त ११५ रुपये गुंतवायचे आहे. काही वर्षांनी तुम्हाला याचे लाखो रुपये मिळणार आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यावर ते डबल होतात.या योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपये गुंतवू शकतात. जास्तीत जास्त तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर डबल पैसे मिळतात.(Post Office kIsan Vikas Patra Scheme)
किसान विकास पत्र योजनेत तुम्ही सिंगल आणि डबल अशी दोन्ही अकाउंट उघडू शकतात. १० वर्षांपेक्षा जास्त मुलांच्या नावेदेखील अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही कितीही खाते उघडू शकतात.या योजनेत तिमाही आधारावर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याज दिले जाते. हे व्याजदर वर्षभराने जारी केले जाते. त्यामुळे हे व्याजदर वाढूदेखील शकते.
या योजनेत जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर १० लाख रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुमचे पैसे डबल होणार आहेत. या योजनेत तुम्ही महिन्याला ११५ रुपये गुंतवणूक करा. या योजनेत तुम्हाला तिमाही आधारावर ७.५ टक्के व्याजदर मिळेल. म्हणजेच तुम्हाला १० लाख रुपये मिळणार आहे.
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ११५ महिन्याचा आहे. म्हणजे ११५ महिन्यात तुमचे पैसे डबल होणार आहेत. तुम्ही खूप कमी दिवसांत लखपती होणार आहात.