महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ फेब्रुवारी ।। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळताना दिसत आहे. दिल्लीत सध्या ४८ जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील असं चित्र स्पष्ट आहे.
दरम्यान, दिल्लीत भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दिल्लीत भाजपने निवडणुक जिंकल्यानंतर पाच चेहरे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत.
भाजपकडून मनोज तिवारी हे दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकतात.
प्ररवेश वर्मा हेदेखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.
वीरेंद्र सचदेवा यांनादेखील मुख्यमंत्रीपद मिळू शकते.
विजेंद्र गुप्ता आणि रमेश बिधूड़ी हेदेखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत.
दरम्यान, आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.