महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नांदेड – दि. १७ ऑगस्ट -नांदेड जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी धर्माबाद येथील प्रतिष्ठित व तरुण व्यापारी सुबोधजी काकाणी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. श्री काकाणी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. आम्ही धर्माबादकर व नांदेड जिल्हा व्यापारी असोसिएशनने मनावर घेतलं तर राज्य विधान परिषदेवर आमदार होण्यास वेळ लागणार नाही एवढेच खरे. यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा. कालच तहसील कार्यालयाच्या वतीने 15 ऑगस्ट चे औचित्य साधून श्री सुबोधजी काकाणी यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. श्री काकाणी हे अत्यन्त मन मिळाऊ व समाज कार्यात अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्त्व आहेत. यांच्या निवडीने सम्पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातुन त्यांच्या मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
श्री काकाणी यांच्या सेवाभावी व्रताची दखल उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी जिल्हाप्रशासनस देऊन ती महाराष्ट्रचे राज्यपाल यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाणे केले आहे या कामाची दखल राज्यपालंनी घेऊन मा.सुबोध काकाणी यांचा सत्कार केला आहे.त्यांच्या या विविध कामाची दखल घेऊन राज्यपाल यांनी उधोग क्षेत्रातुन विधान परिषद वर नियुक्त करावयाची मागणीने जोर धरली होती त्यांना नांदेड जिल्हा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष म्हणून निवड झाल्या मुळे सर्व स्तरातून कौतुक होत असून असचं त्यांची प्रगती व्हावी व ते उघोग क्षेत्रातुन आमदार व्हावे हीच ईश्वर कडे गोरगरीब जनता मागणी करीत आहेत. त्यांना राज्यपाल नियुक्त उद्योग क्षेत्रातून आमदार करावे म्हणून 48 ग्राम पंचायतीनी तसा ठराव पण घेतला आहे.