महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ फेब्रुवारी ।। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने झाले, पण प्रमुख आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांकडून कृष्णा आंधळेच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत, पण दोन महिन्यांपासून कृष्णा आंधले पोलिसांना गुगारा देत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्येला आज दोन महिने पूर्ण झाली, पण आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे बीडमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णा आंधळे याच्या शोधासाठी सीआयडी आणि विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली, पण आंधळे मात्र सर्वांनाच गुंगारा देत आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करूण हत्या करण्यात आली होती. याचा मास्टरमांईड असणाऱा आंधळे अजूनही फरार आहे.