Maharashtra Weather : राज्याचा पारा वाढणार; IMD कडून इशारा….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ फेब्रुवारी ।। फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच राज्यातून थंडी कमी होताना दिसत आहे. IMD ने राज्याच तापमान वाढणार असल्याच म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागातून थंडी गायब झाली असून उकाडा सुरु झाला आहे.

महाराष्ट्रातून हळूहळू थंडी गायब झाली असून त्याची जागा उन्हाच्या तडाख्याने घेतली आहे. राज्यातील अनेक भागात तापमान वाढलं आहे. आतापर्यंत या तापमानाची नोंद 36 अंश झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक परिसरातही पाहायला मिळतो आहे. आता थंडी अनेक ठिकाणी गायब झाली आहे. तोच आता उकाडाही सुरू झाला आहे. या उकाड्याने आता लोकांना वैतागही आला आहे.

उष्णतेची तीव्रता वाढत असून तापमानात तसे बदल होताना दिसत आहे. सकाळपर्यंत 24 तासांत ब्रम्हपुरी येथे उच्चांक 37.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आज कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबईमध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडी नाहीशी होत तापमान 37 अंशांचा आकडा गाठत नागरिकांच्या अडचणी वाढवू शकते असाही थेट इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पालघर इथं तापमानाचा आकजडा धडकी भरवेल. त्यामुळं ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडू नका असाही सल्ला दिला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *