महाराष्ट्र २४ ।। ई – पेपर विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ फेब्रुवारी ।। नुकत्याच झालेल्या SA20 दरम्यान या खेळाडूने चमकदार गोलंदाजी केली, त्याने आठ सामन्यांमध्ये 17.36 च्या सरासरीने 11 बळी घेतले. या दमदार कामगिरीसोबत त्याने त्याचा संघ एमआय केपटाऊनला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एन्ट्री घेत आहे. चला जाणून घेऊयात कोण आहे हा खेळाडू…
‘हा’ खेळाडू घेणार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एन्ट्री
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू कॉर्बिन बॉशचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संघात दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज एनरिच नोर्खीच्या जागी समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हा या मालिकेत हा तिसरा संघ आहे.
पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण
30 वर्षीय बॉशने डिसेंबर 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, त्याने पाकिस्तानविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केले आणि नाबाद 84 धावा काढण्याबरोबरच त्याने पाच विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी फक्त एक कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे.
राखीव म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील
युवा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका हिलाही प्रवासी राखीव म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील करण्यात आले आहे. हे दोन्ही खेळाडू सलामीवीर टोनी डीजॉर्जसह रविवारी कराचीला रवाना झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीच्या समस्येमुळे टेन्शनमध्ये आहे. नोर्खीशिवाय गेराल्ड कोएत्झी, बुरेन हेंड्रिक्स आणि लिझार्ड विल्यम्स हे देखील जखमी झाले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू यासिर अराफतचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तिरंगी मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सल्लागार म्हणून समावेश केला आहे.