महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ फेब्रुवारी ।। पुण्यामध्ये दुचाकीस्वाराची फसवणूक केली जात आहे. बनावट कंपनीच्या लुब्रिकंट ऑईलची विक्री होत आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक दुचाकीस्वरांची आतापर्यंत या बनावट ऑईलद्वारे फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. Hero कंपनीच्या नावाखाली “H Herro” या नावाने बनावट ऑईलची विक्री केली जात आहे.
पुण्यातील अनेक नागरिकांची बनावट ऑईलमुळे फसवणूक झाली आहे. बनावट कंपनीचे लुब्रिकंट ऑईल विक्री करणाऱ्या २ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. ९०० मिली लिटरच्या एकूण ७७८ बॉटल या दोघांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. ताहेर बुन्हानुद्दीन पुनावाला आणि जावेद शेरजमा खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हिरो कंपनीचे लुब्रीकंट ऑईल हे “H Herro” या नावाने करुन पुणे शहर आणि परिसरात विक्री होत असल्याची तक्रार देण्यात आली होती. गुन्हे शाखेने हडपसर भागातील युनीक ऑटोमोबाईल्स अँड स्पेअर पार्टस या दुकानावर छापा टाकला. त्या ठिकाणांवरून पुणे पोलिसांनी ताहेर पुनावाला या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावटीकरण केलेल्या कंपनीचे १ लाख १० हजार रुपयांचे ३०६ ऑईलच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
या आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने हा माल वाघोली येथून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वाघोली परिसरातील एस.एफ. इंडस्ट्रीयल कारपोरेशन फर्मवर छापा टाकत जावेद खानला अटक केली. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचे २ लाख रुपयांचे बनावट इंजीन ऑईलच्या ९०० मिलीच्या एकूण ४७२ बॉटल्स, ५६० बनावट लोगो, १.२७५ खाली बॉटल आणि १०० बॉटल पॅक करण्याचे रिकामे बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला. पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.