महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ फेब्रुवारी ।। पुण्यातील हडपसरमधील सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक आणि खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळालीय. याचबरोबर हडपसर सासवड रोड, हडपसर लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर करण्यात आल्याने पुणेकरांचा प्रवास अजून सुखर होणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील मेट्रो स्थानकांवर विविध सुविधा सुद्धा पुरवल्या जाणार आहेत. ई- बाईक महामेट्रोमार्फत प्रवाशांना उपलब्ध करुन दिली जाणार असून ही सुविधा १० मेट्रो स्थानकांवर दिल्या जाणार आहेत.
पुणे – पिंपरी – स्वारगेट आणि वनाज- रामवाडी मार्गावरील विविध मेट्रो स्थानकांपासून प्रवाशांना आपली कामे करायची असतील तर ही सुविधा खुप फायदेशीर ठरणार आहे. सशुल्क ई- बाईक महामेट्रोमार्फत प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पीसीएमसी, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक,आनंद नगर,वनाझ या १० स्थानकांवर ही सेवा प्रवाशांना मिळणार आहे.
हो पण, या योजनेच्या अंमलबजावणी करण्यास अजून किमान दीड- दोन महिन्याचा कालवधी लागणार आहे. ई-बाईकसाठी पुणे मेट्रोने टीएस स्विच ई-राइड या कंपनी बरोबर नुकताच करार केला आहे. त्यातंर्गत १० मेट्रो स्थानकांवर ‘स्विच ई-राइड’ या ब्रँडच्या नावाने ५० ई-बाइक उपलब्ध असतील. दरम्यान पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६० हजार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना ई-बाईकचा सुद्धा लाभ होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने टीएस स्विच ई-राइड या कंपनीबरोबर नुकताच करार केलाय. त्यातंर्गत १० मेट्रो स्थानकांवर ‘स्विच ई-राइड’ या ब्रँडच्या नावाने ५० ई-बाइक उपलब्ध असणार आहेत. प्रवाशांना ॲप किंवा क्यूआर कोडमार्फत बाईक वापरासाठी घेता येईल. दरम्यान ई- बाईक ताब्यात घेण्यापूर्वी प्रवाशांना ‘केवायसी’ तसेच कंपनीच्या नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. समजा, तुम्ही शिवाजीनगरनला कामाला आहात, तर शिवाजीनगरच्या स्टेशन पासून तुमच्या कामाचं ठिकाण काही अंतरावर असेल तर तुम्ही त्या ठिकाणापर्यंत या बाईक्स नेऊ शकतात.
परत संध्याकाळी घरी जाताना शिवाजीनगरच्या स्टेशनवर ह्या बाईक्स तुम्हाला लावाव्या लागतील. आपले काम करून परतल्यावर बाईक पुन्हा तेथे सोडणे किंवा नजीकच्या डॉकिंग सेंटरवर सोडण्याचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध असणार आहे. डॉकिंग सेंटर्स कोठे असतील, त्यासाठीचे मार्ग कोणते या बाबत संबंधित कंपनी सर्वेक्षण करून निर्णय घेणार आहे. पुणे मेट्रोच्या ‘ॲप’वरही ई- बाईकची लिंक निर्माण करण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिलीय.
काय आहेत ई-बाइकची वैशिष्ट्ये
– गती – किमान ताशी २५ प्रती किलोमीटर
– क्षमता – २ व्यक्ती (जास्तीत जास्त १५० किलो).
– बॅटरी – ‘प्लग-इन आणि स्वॅपिंग’ मॉडेल्ससाठी सुसंगत.
– एका रिचार्जमध्ये जास्तीत जास्त ८० किलोमीटर
– ५ मिनिटांपेक्षा कमी वेळात बॅटरी स्वॅप होणार
– मदतीसाठी मोबाइल ॲपवर ‘एसओएस’ बटण उपलब्ध
– मोबाईल ॲपवरून ई- बाईक सुरू, बंद होणार
– लाइव्ह ट्रॅकिंग आणि जिओ-फेन्सिंग.
प्रस्तावित भाडे –
– प्रति मिनिट – १ रुपया ५० पैसे
– दर तासाला – ५५/- रुपये
– २ तासांसाठी – ११०/- रुपये
– ३ तासांसाठी – १६५/- रुपये
– ४ तासांसाठी – २००/- रुपये
– ६ तासांसाठी – ३०५ रुपये
– २४ तासांसाठी – ४५०/- रुपये