महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ फेब्रुवारी ।। सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे, लवकरच सोन्याचा दर ८७ हजारांच्या पार जाण्याची चिन्ह दिसत आहेत. यात गुरुवारी देखील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ही भारतात सध्या ८६,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किंमतीमध्ये ३६० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २४० रुपयांची वाढ झाली आहे. देशात आजच्या घडीला चांदीचा दर ९६,०५० रुपये आहे. पण आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर नेमके काय आहेत जाणून घेऊ…
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ८६,००० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७८,८३३ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९६१ रुपये आहे तर १ किलो चांदी ९६,०५० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार झाले आहेत.
आदल्या दिवशीचा म्हणजे २७ जानेवारी २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,६४० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९५, ८१० रुपये होता. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज ३३० रुपयांनी तर चांदी १६० रुपयांनी वाढले आहेत.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये. २४ कॅरेट सोन्याची किंमत ८५,९१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे.
नागपूर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे.
नाशिक २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)