महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ फेब्रुवारी ।।पुणेकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण पुणे शहरातील तब्बल १७ रस्ते सुपरफास्ट होणार आहेत. यासाठी पुणे महानगर पालिकेने शहरातील १७ रस्त्यांची निवड केली आहे. या १७ रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरूस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे.
पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी पुणे महापालिकेने आता नव्याने १७ रस्त्यांची निवड करून ‘मिशन १७’ हाती घेतले आहे. त्यामुळे आता पुण्यात आणखी १७ रस्ते सुपरफास्ट होणार आहे. या मिशनअंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीला वेग मिळावा आणि प्रामुख्याने अतिक्रमणे काढून रस्त्यांची डागडुजी, त्यावर डांबरीकरण करून रस्ते विकसित करण्यात येणार आहे.
वाहतुकीचा वेग वाढणार –
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेले ‘मिशन १५’ पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता महापालिकेकडून नव्याने शहरातील १७ रस्त्यांची निवड करून ‘मिशन १७’ राबवण्यात येणार आहे. या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे.
‘मिशन १७’साठी सर्व्हे सुरू –
‘मिशन १७’अंतर्गत निवड केलेल्या सर्व रस्त्यांचा आता सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या रस्त्यांवरील कोणकोणत्या बाबींवर कामे करावी लागणार आहेत, त्याची यादी करण्यात येत असून त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. त्यामुळे शहरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतुकीला गती मिळेल, असा विश्वास पावसकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, जुना एअरपोर्ट रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई हायवे, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, एम. जी. रस्ता, प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता.