महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ फेब्रुवारी ।। लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरु आहे. लाडकी बहीण योजनेत वाढीव पैसे देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यानंतर अजूनही वाढीव पैसे देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. या चर्चांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. 
लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे, असं धुणी भांडी करण्याऱ्या महिला सांगतात. ही योजना कधीही बंद होणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थाने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. यावेळी अनेक महिलांनी आपली व्यथा मांडली आहे.
भांडी घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कसं चालायचं, याचा प्रश्न होता. पण लाडकी बहीण योजनेने आम्हाला आधार दिला, असं एका वृद्धी महिलेने सांगितले. हे सांगताना एका वृद्ध महिलेचा कंठ दाटून आल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतो, असं आश्वासनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत, अशी विनंती महिलांनी केली आहे. त्यांच्या मागणीचा विचार करु, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
