RBI Cancels Holiday: आरबीआयने रद्द केली बँकांची ईदची सुट्टी, दुसऱ्या दिवशी असणार सुट्टी, काय कारण आहे?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी ।। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँकांना 31 मार्च 2025ला बँका सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष 2024-25 च्या शेवटच्या दिवशी बँकिंग सेवांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्व सरकारी व्यवहार वेळेवर पूर्ण करता यावेत यासाठी हे निर्देश दिले आहेत.

साधारणपणे, हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता बहुतेक राज्यांमध्ये रमजान-ईद (ईद-उल-फित्र) मुळे बँका 31 मार्च रोजी बंद असतात. परंतु आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी सर्व शासकीय महसूल वसुली, देयके आणि इतर आर्थिक सेटलमेंट पूर्ण व्हाव्यात, जेणेकरून नवीन आर्थिक वर्षात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, अशी सरकारची इच्छा आहे.

आरबीआयच्या आदेशानुसार, खालील सेवा 31 मार्च रोजी सुरू राहतील-

सरकारी कर भरणे (आयकर, जीएसटी, कस्टम ड्यूटी, उत्पादन शुल्क)

सरकारी पेन्शन आणि अनुदानाचा भरणा

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते वाटप

सरकारी योजना आणि अनुदानाशी संबंधित सार्वजनिक व्यवहार

1 एप्रिल 2025 रोजी बँका बंद राहतील
1 एप्रिल 2025 (मंगळवार) रोजी वार्षिक खाते बंद झाल्यामुळे बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील. बँका फक्त मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशात सुरू राहतील.

डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील
कर भरणा, ऑनलाइन बँकिंगद्वारे निधी हस्तांतरण आणि मोबाइल बँकिंग यासारख्या अनेक डिजिटल सेवा कार्यरत राहतील. ग्राहकांनी आपापल्या बँकेत डिजिटल व्यवहार सुरळीत चालू राहतील की नाही याची खात्री करून घ्यावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *