Video: ‘छावा’ पाहताना चिमुरड्याच्या कापऱ्या आवाजातील शिवगर्जनेने दणाणले थिएटर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ फेब्रुवारी ।। छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा सिनेमा १४ फेब्रुवारीला रीलिज झाला आणि तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचं वादळ आलं आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात १२१.४३ कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर तर ‘छावा’ची कमाई तासातासाला वाढते आहे. याशिवाय वृद्धांपासून चिमुरड्यांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक ‘छावा’ सिनेमाचे कौतुक करत आहेत. सिनेमा पाहिल्यानंतर कोणी कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करतायंत, तर कोणाच्या डोळ्यात पाणी आहे. महाराजांचे बलिदान पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून ऐकायला मिळतायंत.

अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली असून, त्याने प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. काही प्रेक्षक परदेशात ‘छावा’ सिनेमासाठी हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत, तर काही प्रेक्षक छत्रपतींच्या पेहरावात येऊन सिनेमा पाहत आहेत. अभिनेत्याने हे व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले. विकीने आणखी एक व्हिडिओ त्याच्या प्रोफाइलवर शेअर केला, ज्यामधील चिमुरड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

विकीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, सिनेमा पाहिल्यानंतर एक मुलगा शिवगर्जना म्हणतो आहे. शिवगर्जनेवेळी तो अक्षरश: रडतोय आणि आवाजही कापरा झाला आहे. या चिमुरड्याच्या शिवगर्जनेचा व्हिडिओ विकीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि सिनेमाची पोचपावती मिळाल्याची भावना व्यक्त केली.

विकीने लिहिले की, ‘हिच आमची सर्वात मोठी कमाई! बाळा तुझा अभिमान वाटतो… शक्य असतं तर तुला मिठी मारली असती. तुमच्या प्रेमाबद्दल आणि भावनांबद्दल सर्वांचे आभार. शंभूराज्यांचा इतिहास जगातील प्रत्येक घराघरात पोहोचावा अशी आमची इच्छा आहे आणि ते घडताना पाहणे हाच आमचा मोठा विजय आहे.’

https://www.instagram.com/vickykaushal09/?utm_source=ig_embed&ig_rid=cf70612f-dca7-4ebe-9f7e-f597a0b1e1fc

विकीने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट आल्या, त्याने सिनेमात जबरदस्त काम केलं आणि स्वराज्याच्या धाकल्या धन्यांच्या भूमिकेला न्याय दिल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विकीसह रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, डायना पेंटी, विनीत कुमार सिंग या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *