महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ फेब्रुवारी ।। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला येत्या १९ फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारीला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत, मात्र भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
त्यामुळे भारतीय संघाची एक बाजू पडकी आहे. मात्र एक गोलंदाज असाही आहे, जो जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवू देणार नाही आणि भारताला एकहाती विजय मिळवून देऊ शकतो .
भारताला चॅम्पियन बनवू शकतो हा खेळाडू
आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता.
त्याने या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. मात्र या स्पर्धेनंतर त्याला दुखपीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. आता १४ महिन्यांच्या ब्रेकनंतर तो संघात परतला आहे. त्यामुळे त्याच्यावर बुमराहची जागा भरुन काढण्याची आणि चांगली कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.
शमी संघातील अनुभवी गोलंदाज
लक्ष्मीपती बालाजी म्हणाला. ‘ शमी गेल्या १२ महिन्यांपासून क्रिकेट खेळतोय. गेल्या १२ वर्षांपासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्याला आपली जबाबदारी चांगल्याने माहीत आहे.’ आता शमी भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.